7 वर्षाच्या मुलीचा ऑनलाईन क्लासदरम्यान लैंगिक छळ, आरोपी 18 वर्षाचा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   अमेरिकेच्या शिकागोमध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचे समोर आले आहे. सांगितले जात आहे की, वेस्ट चेस्टरफिल्डमध्ये ऑनलाईन क्लासच्या ब्रेक दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ म्यूट करून कॅमेरा बंद करण्यास सांगितले होते. ब्रेक दरम्यान पीडितेचा कॅमेरा चालूच राहिला आणि शिक्षकाशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी ही घटना पाहिली. यानंतर शिक्षकाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या घरी छापा टाकला असता, मुलगी रडत होती आणि “मला माहित नाही का केले , मला क्षमा करा” असे म्हणत होती.

एक वर्षांपासून होत होते अत्याचार

आरोपीची ओळख 18 वर्षीय कॅटरेल ए. वॉल्सच्या रूपात झाली आहे. ज्याच्यावर 13 वर्षांखालील पीडित मुलीसह लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. कुक काउंटी असिस्टेंट स्टेटचे अटॉर्नी एंड्रीना टुरानोने म्हंटले कि, गेल्या वर्षभरापासून वॉल्स मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होती. पीडित मुलीने असेही उघड केले आहे की आरोपीने तिच्यावर यापूर्वी लैंगिक अत्याचार केले होते, परंतु तिच्या वडिलांना हे सर्व कळावे अशी तिची इच्छा नव्हती.

अन्य एका प्रकरणात जामिनावर होता आरोपी

असे सांगितले जात आहे की कॅटरल वॉलस् स्कूलमध्ये सीनियर आहे आणि अवैध बंदूक बाळगल्याप्रकरणी यापूर्वीच जामिनावर होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की त्याला काही प्रमाणात ‘अपंगत्व आहे’, ज्यामुळे तो स्वत: वर नियंत्रण ठेवू शकत नाही.

शाळा व्यवस्थापनाने म्हंटले त्रासदायक घटना

कोविड 19 साथीच्या आजारामुळे बहुतेक शाळा बंद असून या कालावधीत ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, शिकागो पब्लिक स्कूलच्या सीईओ जेनिस जॅक्सन यांनी या घटनेला त्रासदायक असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की शालेय अधिकाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे.

You might also like