धक्कादायक ! धुळ्यात 18 वर्षीय विद्यार्थीनीनं गर्ल्स होस्टेलच्या ‘बाथरूम’मध्येच दिला मुलाला जन्म, सर्वत्र प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील धुळे येथील वसतिगृहातील बाथरूममध्ये एका १८ वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. सोमवारी माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यातील सकरा येथील सावित्रीबाई फुले आदिवासी कन्या वसतिगृहात २९फेब्रुवारी रोजी एका मुलीने बाळाला जन्म दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने बाळाच्या जन्मानंतर वसतिगृहातील बाथरूमच्या बादलीत त्याला सोडले. वॉर्डनने जेव्हा मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला त्यावेळी ती धावत तेथे पोहोचली. साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास दामणे यांनी सांगितले की, तपासणी दरम्यान कोणतीही विद्यार्थिनी मुलाचा दावा करण्यास पुढे आली नाही. त्यानंतर एका मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी संशयावरून नेण्यात आले असता हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, मुलगी आणि त्या बाळाला उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे यावेळी सांगितले.