अबब… गुजरातमध्ये 18000 कोटींचा ब्लॅक मनी

अहमदाबाद : वृत्‍तसंस्था

देशभरातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहिर केली. मात्र, त्यातुन केंद्र सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही पण आता केंद्र सरकारने सुरू केलेल्या इन्कम डिक्‍लरेशन स्कीम (आयडीएस) ला घवघवीत यश मिळाले आहे. आयडीएसनुसार सन 2016 मध्ये केवळ 4 महिन्यात गुजरातमधील नागरिकांनी 18 हजार कोटींची अवैध संपत्‍ती जाहिर केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9166860d-c618-11e8-981a-1d45fe81ced1′]

गुजरातमधील नागरिकांनी जाहिर केलेला ब्लॅक मनी हा देशभरातून जमा झालेल्या एकुन ब्लॅक मनीच्या तब्बल 29 टक्के एवढी आहे. नोटाबंदी लागू होण्यापुर्वी जून आणि सप्टेंबर 2016 या चार महिन्याच्या दरम्यान ब्लॅकमनी रोखण्यासाठी आयडीएसमार्फत घोषणा करण्यात आली होती. त्या स्कीमला प्रतिसाद देतच मोठे प्रॉपर्टी डिलर महेश शाह यांनी 13 हजार 860 कोटींच्या अवैध संपत्‍तीचा खुलासा केला आहे. आयडीएसकडे माहिती अधिकारामार्फत काळया पैशाबाबत माहिती मागविण्यात आली होती. त्यातुनच ही माहिती समोर आली असाहे. माहिती अधिकारामार्फत मागविण्यात आलेल्या माहितच उत्‍तर तब्बल दोन वर्षानंतर देण्यात आले आहे. दि. 21 डिसेंबर 2016 रोजी भारत सिंह झाला यांनी ही माहिती मागविली होती. त्यांना जवळपास दोन वर्षानंतर ही माहिती मिळाली आहे.

बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम

गुजरातमध्ये जून ते सप्टेंबर 2016 या चार महिन्यात आयडीएस योजनेअंतर्गत 18 हजार कोटींची अवैध संपत्‍ती घोषित करण्यात आली असून आयकर विभागाने प्रामुख्याने पोलिस अधिकारी, राजकारणी आणि नोकरशहांची संपत्‍ती अद्यापही घोषित केलेली नाही. भारत सिंह झाला यांचा पहिला अर्ज अनेक दिवस इकडे तिकडे फिरला. त्यानंतर भाषेचा हवाला देत अधिकार्‍यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, दि. 5 सप्टेंबर रोजी मुख्य माहिती आयुक्‍तांनी दिल्‍लीत आयकर विभागाला माहिती देण्याच्या आदेश दिला आणि मला माहिती मिळाली असे भारत सिंह झाला यांनी सांगितले. मोदी सरकारने 2016 मध्ये आयडीएसची घोषणा केली होती. त्यानंतर बहुतांशी जणांनी ब्लॅक मनी जाहिर केला आहे. केवळ गुजरातमध्ये चार महिन्यात 18 हजार कोटींचा काळा पैसा सापडला आहे.

[amazon_link asins=’8192910911,1542040469′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b9f4f36d-c619-11e8-b7b1-4ddd472de280′]

जाहीरात