Coronavirus : आतापर्यंत मुंबई पोलिस दलातील 1871 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण, 21 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात पोलीस दलात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात मुंबई पोलीस दलात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधित झाला आहे. मुंबई पोलीस दलातील 1871 पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 21 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या पोलिसांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यंत 853 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 21 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1871 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर राज्य राखीव पोलीस दलाच्याही 82 जणांना कोरोनाची बाधी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांना मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये 259 अधिकारी आणि 1612 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

8 जूनपर्यंत आलेल्या अहवालातील माहिती

कोविड सेंटरमध्ये एकूण 571 जण आहेत. 231 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर होम आयसोलेशनमध्ये 31 जणांना ठेवण्यात आलं आहे. 164 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 634 जण बरे झाले आहेत. मात्र, त्यांनी अजून ड्युटी जॉईन कलेली नाही. जे बरे झाले आहेत आणि ड्युटी जॉईन केली असे 219 जण आहेत. तर 21 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 853 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.