Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चे 189 नवीन रूग्ण, एकूण संख्या 1182 वर, दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं मुंबई शहरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन देशातील काही राज्यांनी चालु असलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवून तो 30 एप्रिलपर्यंत असेल असं स्पष्ट केलं होते. पंजाब आणि ओडिशानंतर आता महाराष्ट्रातील देखील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हा किमान 30 एप्रिल पर्यंत असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज कोरोनाचे 189 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. आता मुंबईतील संख्या 1182 वर जाऊन पोहचली आहे.


मुंबईत आतापर्यंत तब्बल 75 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात तब्बल 11 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. एकुण रूग्ण संख्या 1182 वर जाऊन पोहचली असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील काही परिसर देखील सील करण्यात आला आहे.