19 उमेदवार रिंगणात : सात जणांची माघार

प्रत्येक एक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम बॅलेट मशीन लागणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी 31 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ अर्ज वैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यासह १९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. उमेदवारांची संख्या १६ पेक्षा अधिक आहेत. बॅलेट मशीनवर १५ +१ अशी रचना करण्यात आलेली असते. आता उमेदवारांसंख्या १९ असल्याने यंदाच्या निवडणुकीत २ बॅलेट मशीनचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रशासनाला २ हजार मशीनची आवश्यकता भासणार आहे.

राष्ट्रवादी आणि विखे यांनी या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून आहे.

Loading...
You might also like