कोल्हापूरजवळ १९ लाख ५० हजार रुपयांची रोकड पकडली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या नाकाबंदीदरम्यान गगनबावडा येथे एका खासगी बसमधून पोलिसांनी १९ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही बस गोव्याहून मध्यप्रदेशकडे जात होती.

याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतोषकुमार पटेल असे त्याचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थीर निरीक्षण पथकची तपासणी सुरु आहे. निवडणूकीच्या काळात येणाऱ्या पैशांवर पथकाचे लक्ष आहे. त्यावेळी बुधवारी रात्री कोल्हापूरातील गगनबावडा येथे अशाच प्रकारे पथकाने एका खासगी ट्रॅवल्सची तपासणी केल्यावर १९ लाख ५० हजार रुपये इतकी रोकड आढळून आली. २ हजारांच्या एकूण २२५ नोटा आणि ५०० रुपयांच्या ३ हजार नोटा मिळून आल्या. गोव्याहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या या बसमधून संतोषकुमार पटेल याला ताब्यात घेण्यात आले आहे.