कामाची गोष्ट ! 19 लाख शेतकर्‍यांनी दरमहा 3 हजार रूपयांच्या पेन्शनचा घेतला ‘लाभ’, तुम्ही देखील असा अर्ज करून मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत १९.२० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत ५ कोटी शेतकऱ्यांना ३ हजार प्रतिमहिना पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. विशेष म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं आपण नोंदणी करू शकता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत लिखित उत्तराद्वारे सांगितलं की, या योजनेत छोट्या आणि मर्यादित शेतकऱ्यांना वयोवृद्धात सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

LIC मार्फत देखील मिळवू शकता किसान पेन्शन योजनेची सुविधा
किसान पेन्शन योजनेंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या ६० वर्षानंतर प्रतिमहीना कमीत कमी ३ हजार रुपये दिले जातात. या पेन्शन निधीचं नियोजन LIC (Life Insurance Corporation of India) करते.

नोंदणी कशी करावी
या योजनेची माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपण शेतकरी कॉल सेंटर नंबर 1800-180-1551 वर कॉल करून घेऊ शकता. तसेच सामान्य सेवा केंद्र अधिकारी (सीएससी) आणि राज्य नोडल अधिकारी यांना देखील संपर्क करू शकता. ही नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डचा नंबर द्यावा लागतो. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार केलं जातं.

पती-पत्नी दोघांनाही मिळू शकतो लाभ
केंद्र सरकारच्या या पेन्शन योजनेचा लाभ पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊ शकतात. या योजनेनुसार दोघांनाही ३ हजार रुपये मिळू शकते. ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पत्नीला मासिक पेन्शन ५० टक्के म्हणजेच १५०० रुपये हे दर महिन्याला मिळणार.

या योजनेत ५ वर्षानंतर बाहेर पडण्याची मुभा
विशेष म्हणजे या योजनेतून जर आपणास बाहेर पडायचे असेल तर आपण आपल्या मर्जीनुसार बाहेर पडू शकतात. ५ वर्ष नियमित पैसे भरले असतील तर बाहेर पडताना गुंतवलेली रक्कम ही एलआयसीच्या माध्यमातून बँकांच्या व्याजदरानं परत मिळत असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like