शिवसेना-भाजपमधील 19 आयारामांचा पराभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. तसेच राज्यात युतीच्या बाजूने लाट होती. या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. दोन्ही पक्षांनी आलेल्या आयारामांना विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र, 35 आयारामांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे. पक्षबदलू नेत्यांना मतदारांनी नाकारले आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये 11 उमेदवार शिवसेनेचे आहेत तर 8 उमेदवार भाजपचे आहेत.

शिवसेनेतील पराभूत आयाराम

1. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव त्यांचेच पुतणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
2. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघातून पराभव झाला.
3. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बार्शीचे दिलीप सोपल यांचा पराभव अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी पराभव केला आहे.
4. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव.
5. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघातून पराभव.
6. विजय पाटील यांचा वसई मतदारसंघातून पराभव.
7. संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघातून पराभव.
8. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मधून पराभव.
9. नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघातून पराभव.
10. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघातून पराभव.
11. प्रदिप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून पराभव झाला आहे.

भाजपमधील पराभूत आयाराम

1. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.
2. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.
3. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
4. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
5. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.
6. भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
7. भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.
8. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांच्या गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.

Visit : Policenama.com