एक चूक.. आणि तरुणीने गमावली दृष्टी 

वृत्तसंस्था – अनेक वेळा लोक आपला वेळ वाचवण्यासाठी आणि काम सोपं करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करतात पण चुकून गडबडीत या मायक्रोवेव्हचा वापरही चुकीचा करतात. ही अशी चूक कदाचित आपल्या आयुष्याचेही नुकसान करते. अशाच एका चुकीमुळे  तरुणीला आपला डोळा गमवावा लागला आहे . १९ वर्षीय कर्टनी वुड ही तरुणी नेहमी प्रमाणे आपला नाश्ता तयार करत होती. तिने मायक्रोव्हेवमध्ये अंडी उकडण्यासाठी ठेवली. पण तिला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, हीच अंडी तिच्या डोळ्यांची दृष्टी घालवतील.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या शुक्रवारी घडली. कर्टनी एकटी राहते. तिने नेहमीप्रमाणे मायक्रोव्हेवमध्ये अंडी उकडण्यासाठी ठेवली, काही वेळाने तिने अंडी बाहेर काढली आणि अचानक अंडी फुटून तिच्या डोळ्यांना चिकटली. यानंतर ती लगेच बाथरुममध्ये गेली आणि थंड पाण्याने तिने चेहरा धुतला. पण तिला काही दिसत नव्हतं.या घटनेनंतर साधारण ४८ तासांनंतर कर्टनीला दिसायला लागलं होतं. पण तिला डाव्या डोळ्याने बघायला अजूनही अडचण येत आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितले की, तिच्या डाव्या डोळ्याला जास्त इजा झाली आहे. कदाचित तिला या डोळ्याने दिसायला लागण्याची शक्यता कमीच आहे. सध्या कर्टनी उपचार घेत आहे.
… म्हणून फुटलं अंड 
ब्रिटीश मेडिकल जर्नलने मायक्रोव्हेव कंपन्यांना उकळलेली अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम न करण्याची सूचना मायक्रोव्हेववर लिहिण्यास सांगितले आहे. त्यांच्यानुसार, अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्याने त्याचं तापमान वाढतं. पण मायक्रोव्हेवचे तरंग अंड्याच्या बाहेरील आवरणाला  इतकं गरम करु शकत नाहीत की, ते टिचकतील. अशात अनेकदा अंड्यांच्या काही भागात वाफ तयार होते. त्यामुळे अंडी तोडतांना त्यात ब्लास्ट होतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us