home page top 1

पवित्र ‘रमजान ईद’च्या दिवशी ‘पबजी’मुळे १९ वर्षीय ‘फारुख’ची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राहुरी तालुक्यातील आंबी या परिसरात ‘पबजी’ या गेममुळे १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज ही दुर्दैवी ही घटना घडली.

फारुख मन्सूर इनामदार हे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,
फारुक या युवकाने आंबी परिसरात नदीच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पबजीच्या नादात त्या युवकाने आपली जीवनयात्रा संपविली, असा प्राथमिक अंदाज आहे.

मयत फारुक याने आत्महत्या केल्याचे प्रथम त्याचा भाऊ शाहरुख मन्सूर इनामदार याने पाहिले. त्याने घटनेची माहिती आंबी येथील पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यांनी
देवळाली पोलीस दूरक्षेत्रास दिली. तेथील कर्मचारी घटनास्थळी गेले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, राहुरी पोलिस स्टेशनला अकस्मात मयतची नोंद करण्यात आली आहे.

रमजान ईदच्या दिवशीच मुस्लिम तरुणाने आत्महत्या
केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. फारुक हा दिवसभर तासनतास पबजीचा गेम खेळत होता. त्या व्यसनातूनच त्याने ही आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

Loading...
You might also like