19 वर्षाच्या मुलीने आपल्याच घरात बॉयफ्रेंडसोबत केली 16 लाखांची चोरी, कारण ऐकून आई-वडील आणि पोलिसांना बसला धक्का

लखनऊ : वृत्त संस्था – वडीलांना नाते मंजूर नव्हते, यासाठी 19 वर्षाच्या मुलीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी पैशांची आवश्यकता होती, तेव्हा मुलीने आपल्याच घरात 16 लाख रुपयांची चोरी केली. आई-वडीलांच्या काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि दोघांना काढा दिला. यानंतर बॉयफ्रेंड (boyfriend) घरात घुसला आणि 13 लाख रुपये रोख आणि तीन लाखांचे दागिने चोरी करून गेला, आणि मुलगी दरवाजा बंद करून झोपी गेली. सकाळी रोख रक्कम आणि दागिने जागेवर नसल्याचे पाहून आई-वडीलांची झोप उडाली, नंतर त्यांची मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंडच चोर असल्याचे समजले.

प्रकरण युपीच्या लखनऊचे आहे. 19 वर्षांच्या तरूणीने प्रियकराच्या मदतीने कथित प्रकारे आपल्या आई-वडीलांना नशेचा पदार्थ पाजला आणि आपल्याच घरात चोरी करायला सांगितले. ही बाब व्यापारी मनोज यांनी चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर समोर आली.

31 मे राशीफळ : आज ‘या’ 6 राशींचे ग्रह प्रबळ, मिळणार मोठे यश, इतरांसाठी असा आहे महिन्याचा शेवटचा दिवस 

पुण्यात साधे पेट्रोलही शंभरी ‘पार’ !

पोलीस उपायुक्त, (दक्षिण) ख्याती गर्ग यांनी सांगितले की, सर्व लॉकर जिथे किमती वस्तू ठेवल्या होत्या ते तोडले होते, परंतु घरात जबरदस्तीने घुसल्याची कोणतीही खुण नव्हती. जेव्हा चौकशी केली तेव्हा व्यापार्‍याची छोटी मुलगी खुशबूने गुन्ह्यातील आपला सहभाग कबुल केला. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खुशबू, तिचा मित्र विनय यादव आणि त्याचा साथीदार शुभम यादवला अटक केली आहे. चोरीचा माल सुद्धा जप्त केला आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.

गर्ग यांनी सांगितले की, मनोज यांना त्यांच्या मुलीचे विनय सोबतचे संबंध मंजूर नव्हते, ज्यानंतर खुशबूने पैसे घेऊन घरातून पळण्याचा निर्णय घेतला. खुशबूने मित्रासोबत मिळून आपल्याच घरात चोरी केली. पोलिसांना खुशबूवर तेव्हा संशय आला जेव्हा खुशबू हे सांगू शकली नाही की तिने शुक्रवारी रात्री स्वता काढा का प्यायला नाही.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’