19 वर्षाच्या मुलीवर पहिल्यांदा रिक्षावाल्यानं केला ‘बलात्कार’, तिनं ज्यांना मदत मागितली त्यांनीही केलं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईमध्ये 19 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, या मुलीवर दोन तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या घटनेत तीन लोकांनी बलात्कार केला.

ही घटना 19 फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ऑटो रिक्षा चालकासह तीन आरोपींना अटक केली आहे.

रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याने सांगितले की, पीडित मुलगी 18 फेब्रुवारीला आपल्या नातेवाईकांसह ट्रेनने कुठेतरी निघाली होती. परंतु, घाटकोपर रेल्वेस्थानकावर तिची ट्रेन सुटली आणि ती तेथे एकटीच राहिली.

यानंतर पीडित मुलगी दुसरी ट्रेन पकडून ठाणेजवळील मुंब्रा रेल्वे स्टेशनमध्ये पोहचली. 19 फेब्रुवारीला ती दुसर्‍या ट्रेनमध्ये बसून दिवा स्टेशनवर पोहचली. स्टेशनवर पोहचल्यानंतर तिने पैशांसाठी आपली अंगठी विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने स्टेशनवर बसलेल्या एका भिकारी महिलेकडे मदत मागितली. परंतु, ती रात्रीपर्यंत अंगठी विकू शकली नाही.

अंगठी विकण्यासाठी मुलगी स्टेशनपासून खुप दूरपर्यंत आली होती. अनोळखी शहरात तिने स्टेशनवर परतण्यासाठी एका हॉटेलच्या बाहेरून रिक्षा पकडली आणि रिक्षा चालकाला जवळच्या रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितले. परंतु, रिक्षा चालक तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन जाण्याऐवजी नवी मुंबई येथील महापे परिसरातील एका जुन्या इमारतीमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने पीडित मुलीला एका मंदिराजवळ सोडले.

रात्रीचे सुमारे 10 वाजले होते. यावेळी पीडित मुलीने स्कुटरवरून चाललेल्या दोघांना जवळच्या स्टेशनचा पत्ता विचारला. हे दोघेजण तिला स्कूटरवर बसवून घेऊन गेले. या दोघांनी पीडित मुलीला घंसोलीजवळील एका वेगळ्या ठिकाणी नेले, याच ठिकाणी दोघांनी मुलीवर सामुहिक बलात्कार केला.

एकाच रात्री दोन वेळा बलात्काराच्या घटनेने पीडित मुलगी हादरून गेली होती. ज्यानंतर 23 फेब्रुवारला पीडितेने रबाळे एमआईडीसी पोलीस ठाण्यात सर्व घटना सांगितली आणि बलात्काराचे प्रकरण दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आले आहे. या प्रकारात सहभागी तिनही आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like