1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; छोट्या पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 1920 Horrors Of The Heart Trailer Out | छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) ही आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कृष्णा भट्ट (Krishna Bhatt) यांचा नवीन हॉरर चित्रपट ‘1920- हॉरर ऑफ द हार्ट’ (1920 Horrors Of The Heart Trailer Out) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अविका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर नुकतेच रिलिज झाले. पोस्टरमध्ये अविका मेणबत्ती घेऊन उभी आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Advt.

2008 साली रिलीज झालेल्या ‘1920’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यामध्ये रजनीश दुग्गल (Rajnish Duggal) आणि अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत दिसले होते. आता येत्या 23 जूनला याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अविका कौर ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कृष्णा भट्ट हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरला हजारो व्ह्युज आले आहे. कृष्णा भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..’. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. वडिलांच्या बदल्याची ही कहानी असल्याचा अंदाज ट्रेलर बघून येत आहे.

अविका गोरनेही आपल्या इंन्स्टाग्रामवर ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’ (1920 Horror Of The Teart) या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अविका घाबरलेल्या चेहऱ्याने हातात एक मेणबत्ती धरून उभी असल्याचे दिसत आहे. या पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी अविकाच्या या आगामी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

महेश भट्ट (Mahesh Bhatt) प्रस्तुत विक्रम भट्ट प्रोडक्शन्स (Vikram Bhatt Productions) निर्मित या
चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अनेक दिवसांनंतर बॉलीवुडमध्ये हॉरर चित्रपट आल्याने सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या अविका गोरच्या छोट्या पडद्यावरील भूमिकांमुळे ती घराघरात पोहचली आहे.
तिच्या ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) या मालिकेमधील आनंदी या भूमिकेला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली.
आता ती ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे.
या चित्रपटातील तिच्या लूकचे सोशल मीडियावर (Social Media) कौतुक होत आहेत.
अविकाच्या या पहिल्या चित्रपटाला (Avika Gor Debut Flim) प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल याकडे
साऱ्याचे लक्ष लागले आहे. (1920 Horrors Of The Heart Trailer Out)

Web Title :   1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 Horror of the Heart trailer hits the audience; Small screen ‘he’ famous actress in lead role

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना मोठी भेट, किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘शिवराज्याभिषेक’ दिनाचे औचित्य साधून देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले… (व्हिडिओ)

ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात