शीख दंगल १९८४ : आत्मसमर्पणासाठी काँग्रेस नेत्याने कोर्टाला मागीतली मुदतवाढ 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –१९८४ च्या शीख विरोधी दंगलीच्या  हिंसाचारास न्यायालयाने दोषी ठरवलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी आत्मसर्पणासाठी दिलेल्या मुदतीत वाढ मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत आपणास मुदत वाढ देण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

३१ ऑक्टोंबर १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर उसळलेल्या शीख दंगलीचा अनेक शीख लोकांची हत्या करण्यात आली. त्याच प्रकरणासंदर्भात ३४ वर्षांनंतर पहिल्यांदा निकाल आला आणि त्या निकालात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपूर्वी आत्मसर्पण करण्यास सांगितले आहे.

काय सुनावली शिक्षा
सज्जन कुमार यांच्यावर दंगल भडकवणे हत्या करणे हत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि कट रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सज्जन कुमार दोषी असणारे प्रकरण नेमके काय आहे 
सज्जन कुमार यांना दोषी ठरवलेले प्रकरण असे आहे कि, दिल्ली कॅन्टाेलमेंट बोर्डच्या परिसरात राज नगर भागात एक पाच सदस्यांचे कुटुंब या दंगलीत मारले गेले आहे. विशेष म्हणजे या कुंटुबांतील सर्व सदस्य या दंगलीत मारले गेले होते. त्या कुटुंबाच्या हत्येत काँग्रेस नेते सज्जन कुमार हे आरोपी आहेत. हा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१८ रोजी दिला आहे.

तर याच निकालाच्या बाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ माजवण्यात आला होता. आता या निकालाच्या बाबत सज्जन कुमार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळेच त्यांनी आत्मसमर्पणासाठी आधी याचिका दाखल करायची असावी असे म्हणले जाते आहे. त्याच प्रमाणे या निकालाच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून हा निकाल  निवडणुकीचा मुद्दा बनवू शकते. तर भाजप काँग्रेसवर हिंसाचार भडकवणारा पक्ष म्हणून चिखल फेक करू शकतो.