मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपीचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याला विशेष टाडा न्यायालयाने २०१७ मध्ये दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्याला नागपूर कारागृहात ठेवण्यात आले होते.

अब्दुल तुर्क याचा नागपूरमधील जीएसएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्याने मुंबईतील सेंच्यूरी बाजार येथे पेरलेल्या आरडीएक्सच्या स्फोटात १२ मार्च १९९३ रोजी ११३ लोक ठार झाले होते. गनी याने माहीम येथील अल हुसेनी या टायगर मेमन याच्या घरून आरडीएक्स असलेली कमांडर जीप गनीने सेंच्यूरी बाजारापर्यंत चालवत आणल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्या प्रकारणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. या स्फोटामध्ये ११३ ठार झाले तर २२९ लोक जखमी झाले होते. तर कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

साक्षिदारांनी त्याच्या विरुद्ध दिलेल्या भक्कम पुराव्यांवरून तत्कालीन न्यायाधिश पी.डी कोदे यांनी अब्दुल गनी तुर्कला शिक्षा सुनावली होती. गनीला अर्धांगवायूचा झटका आला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.