1 जानेवारी 2020 पासुन बदलणार ‘हे’ 10 नियम, सर्वसामान्यांवर थेट ‘परिणाम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच काही मोठ्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. याची झळ सर्वसामान्यांच्या खिश्याला बसणार आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२० पासून तुम्हाला एनईएफटीमार्फत व्यवहारासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही. तसेच ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत जुन्या डेबिट कार्डला इलेक्ट्रॉनिक चिपवाल्या कार्डने बदलणे आवश्यक आहे. नवीन वर्षात जुन्या डेबिट कार्ड मधून पैसे निघू शकणार नाहीत.

जाणून घेऊया १० मोठ्या बदलांबाबत:

१) एटीएम कार्ड : १ जानेवारी पासून फक्त चिप असणारे कार्ड चालणार आहेत

३१ डिसेंबर पर्यंत जुन्या डेबिट कार्डला इलेक्ट्रॉनिक चिपवाल्या कार्डने बदलणे आवश्यक आहे. नवीन वर्षात जुन्या डेबिट कार्ड मधून पैसे निघू शकणार नाहीत. कारण एटीएम ग्राहकाची माहिती ओळखण्यासाठी कार्डमध्ये एक चुंबकीय पट्टी असते ती पट्टीच काम करणार नाही.

भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना चुंबकीय पट्टी डेबिट कार्ड ला ईएमव्ही चिप आणि पिन आधारित कार्डमध्ये बदलण्यास सांगितले आहे.

भारतीय स्टेट बँकेने ईएमव्ही चिप आणि पिन आधारित डेबिट कार्ड देणे सुरू केले असून बँकेत डेबिट कार्ड बदलण्यासाठीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत निश्चित केली आहे. जर आपण असे केले नाही तर आपले एटीएम कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. त्यातून कुठलेही व्यवहार होणार नाहीत.

जर डेबिट कार्ड बदलले नाही तर आपण एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाही. ईएमव्ही चिप आणि पिन आधारित डेबिट कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन करण्यासाठी हे काम आपणास करावे लागणार आहे.

२) एनईएफटी : ऑनलाइन व्यवहारांवर दिले जाणार नाही शुल्क

१ जानेवारी २०२० पासून आता बँकांना एनईएफटीमार्फत व्यवहारासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही. एनईएफटी आता आठवड्यातून सात दिवस, २४ तास उपलब्ध असेल. भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे प्रीपेड सोडता सर्व बिले दिली जाणार आहेत.

३) पीएफ : नोकरी करणाऱ्यांसाठी नियम होणार सुलभ

नवीन वर्षात पीएफ संबंधित नियमही सोपे होणार आहेत. नवीन नियमांनुसार, त्या कंपन्याही पीएफच्या कक्षेत येतील ज्यांमध्ये १० कर्मचारी आहेत. पीएफच्या योगदानाचा निर्णय केवळ कर्मचारी घेऊ शकतात. पेन्शन फंडामधून एकरकमी पैसे काढणे शक्य होणार आहे.

४) कर्ज : रेपो रेट संबंधित कर्ज ०.२५ टक्क्यांनी स्वस्त

एसबीआयने रेपो रेट संबंधित कर्जावरील व्याज ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहे. जुन्या ग्राहकांनाही १ जानेवारी २०२० पासून नवीन दरांचा फायदा होणार आहे.

५) दागिन्यांशी संबंधित नियम बदलतील – हॉलमार्किंग आता अनिवार्य

सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे आता आवश्यक झाले आहे. याबाबत ग्रामीण भागात १ वर्षासाठी सूट असणार आहे. यामुळे आता किंमतीमध्ये देखील वाढू होऊ शकते.

६) रुपे-यूपीआय वर शुल्क आकारण्यात येणार नाही

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२० पासून रुपे कार्ड आणि यूपीआयच्या व्यवहारांसाठी मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क लागणार नाही. जर एखाद्या व्यवसायाची उलाढाल ५० कोटींपेक्षा जास्त असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत दोन डिजिटल पेमेंट ऑप्शन ठेवावे लागणार आहेत. ते त्यांच्या ग्राहकांकडून पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे एमडीआर (MDR) शुल्क आकारणार नाहीत.

७) PAN कार्ड आधार कार्डला लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ डिसेंबर २०१९ होती. असे न केल्यास पॅनकार्ड १ जानेवारीपासून अवैध ठरणार होते. परंतु आता यासाठी मार्च २०२० पर्यंत वेळ मिळाला आहे.

८) विमा पॉलिसी : प्रीमियम महागणार

विमा नियामक IRDAI ने चेंज लिंक्ड आणि नॉन-लिंक्ड जीवन विमा पॉलिसींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रीमियम महाग होणार आहे. त्याचबरोबर एलआयसीनेही क्रेडिट कार्ड पेमेंटवरील शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे.

९) ATM मधून पैसे काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल केले आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या ग्राहकांना आता रात्री एटीएममधून पैसे काढण्याच्या वेळी खात्याशी लिंक असलेला मोबाइल नंबर जवळ ठेवावा लागणार आहे. बँकेने एटीएममधून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत १०,००० पेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी ओटीपी आधारित प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१०) फास्टॅग : आता आवश्यक, अन्यथा डबल टोल

१५ जानेवारीनंतर एनएच वरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये फास्टॅग असणे अनिवार्य असेल. १ कोटी फास्टॅग प्रसिद्ध करण्यात झाले असून फास्टॅग जर नाही केले तर डबल टोल भरावा लागणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/