बॉलीवूडचे आतापर्यंतचे सर्वात महागडे गाणे प्रदर्शित

मुंबई : वृत्तसंस्था – बऱ्याच काळापासून सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार यांच्या बहूचर्चित ‘2.0’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. अक्षयचा व्हिलेनवाला अंदाज बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या गुरुवारी (दि.२९ नोव्हेंबर) प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे बजेट तब्बल २० कोटी रुपये इतके आहे.आतापर्यंतचं सर्वात महागडं असं हे गाणं आहे.

असे आहे गाणे

तू ही रे हे गाणं सिनेमातलं एकमेव गाणं आहे. एमी जॅक्सन यात रोबो लूकमध्ये दिसते.रजनीकांत आणि एमी जॅक्सन या दोघांवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ‘तु ही रे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये रजनीकांत आणि अॅमी जॅक्सन खास रोबोटिक्स डान्स स्टेप्स करताना पाहायला मिळत आहेत. तेलुगु आणि तमिळ भाषेत हे गाणे अगोदरच प्रदर्शित करण्यात आले आहे. हिंदी भाषेतील गाण्याला अरमान मलिक आणि शाषा तिरूपती यांनी आवाज दिला आहे. या गाण्याला संगीत ए.आर.रेहमाननं दिलं आहे. 2.0 सिनेमाचं बजेट 400 कोटी इतकं आहे. 2.0 रिलीज होण्याआधीच चित्रपटानं 370 कोटी कमवले आहेत. भारतातील जास्त खर्चिक असलेल्या सिनेमाच्या कमाईसाठी एका पद्धतीचा वापर केला आहे.

2.0 चित्रपटातील ७ सीन वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप 

अवघ्या एका आठवड्यावर या चित्रपटाचं प्रदर्शन येऊन ठेपलं असताना सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही सीनमध्ये बदल करण्यास सांगितला आहे.सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू ए प्रमाणपत्र दिले आहे. मात्र चित्रपटातील काही शब्द आक्षेपार्ह असल्यामुळे ते म्यूट, तर काही रिप्लेस करण्यास सांगितले आहे.