पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९० लाखांचे दोन किलो सोने जप्त

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एका महिलेला अटक करुन ९० लाख ४४ हजार २३५ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. हि कारवाई सीमा शुल्क विभागाने आज (रविवार) केली. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच किलो सोने जप्त केले आहे. सीमा शुक्ल अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी दुबईहून आणलेले तीन किलो सोने जप्त केले होते.
डॅनटसा ज्यूनेका जॉन असे सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आज स्पाइस जेट विमान क्रमांक एस जी ५२ विमानाने पुणे विमानतळावर दाखल झाली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने तिच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता तिच्या जवळील चार प्लॅस्टिक बॅग मध्ये दोन किलो ७९१ ग्रॅम वजनाचे  ९० लाख ४४ हजार २३५ रुपये किमतीचे सोने आढळून आले. तिच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई उपायुक्त के आर रामाराव हर्षल मेटे, अधिक्षक भगवान शिंदे, एसएस खैरे, एस व्ही झरेकर सतीश सांगळे, निरीक्षक संगीता बाळी, राजेंद्र मीना शिवाजी वाळू देशराज मीना, हवालदार एस एस निंबाळकर यांनी केली.
आठवड्याभरातील दुसरी कारवाई
बुधवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास अबूधाबी वरुन आलेल्या विमानातून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ किलो सोन जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या पद्धतीने हे सोने लपवून आणले होते.  त्यावेळी आरोपींची तपासणी केल्यावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळून आले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी या दोन प्रवाशांकडून १२ सोन्याची बिस्कीटे जप्त केली होती.