‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरुन १८ वर्षाच्या तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आला होता. तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेह पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी चार वर्षानंतर गुन्हा उघडकीस आणून तीन जणांना यापूर्वीच अटक केली होती. पोलिसांनी बुधवारी (दि.२६) या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

विनायक विलास चव्हाण (वय-१८ (वय-१८ रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल शिवाजी खरात (वय-२९ रा. पर्वती पायथा, जनता वसाहत, मध्यवर्ती मित्र मंडळ, पुणे), आकाश उर्फ पप्पु रविंद्र गोळे (वय-२६ रा. एस.टी. स्टँड जवळ, मशालीचा माळ, सरकारी मठाजवळ, भोर) यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ed07573-c268-11e8-abeb-eb922690dbd7′]

विनायक चव्हाण हा नऱ्हे येथील झील कॉलेज परिसरात मिळेल ते करुन राहत होता. दरम्यान, त्याची त्याच परिसरात पानाची टपरी असलेल्या आरोपी मनोज पाडळे व त्याचे साथिदार सागर पवार, विशाल खरात, विकी चावडा, बाळा उर्फ बालाजी सुर्य़वंशी, पप्पु गोळे, अंकुश याच्याशी ओळख झाली. विनायक हा त्यांच्याविषयीची माहिती प्रतिस्पर्धी टोळीला देत असल्याच संशय पाडळे व त्याच्या साथिदारांना होता. त्यामुळे त्यांनी १५ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१४ दरम्यान परिसरातील एका स्नुकर सेंटरवर विनायकला बेदम मारहाण केली. १७ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसात ते बाराच्या दरम्यान आरोपींनी संगनमतानी विनायकचे अपहरण करुन अभिनव कॉलेजच्या पाठिमागे नेले. या ठिकाणी विनायकवर चाकुने वार करुन आणि चाकूने गळा चिरुन खुन केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी खड्डा खाणून त्यामध्ये विनायकाच मृतदेह पुरला. विनायक बपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी केली होती. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाने उघडकीस आणून आरोपींविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दत्तवाडी पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील फरार असलेले दोन आरोपी विश्रांतीनगर कॅनोल परीसरात येणार असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी आरोपी चालत येत असता दिसून आले. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जावू लागल्याने त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd4668f8-c267-11e8-a467-7ba59f36d63b’]
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, पोलीस नाईक संतोष सावंत, पोलीस शिपाई संग्राम शिंगारे, रफिक नदाफ, पुरुशोत्तम गुन्ल्ला व श्रीकांत दगडे यांच्या पथकाने केली.