शिवसेना खा. संजय राऊतांच्या रक्तवाहिन्यात आढळले 2 ‘ब्लॉक’, तातडीने ऑपरेशन सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार नाही असे समजत आहे. कारण त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज दिला जाणार असं म्हटलं जात होतं. परंतु आता अँजिओग्राफीनंतर राऊतांवर अँजिओप्लास्टी सुरु असल्याने त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार नाही.

दरम्यान राज्याच्या राजकारणाबाबत संजय राऊत यांना पूर्ण कल्पना आहे. अँजिओप्लास्टीच्या ऑपरेशननंतर आगामी दोन दिवसांतच संजय राऊत राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील अशी माहिती संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. सध्या संजय राऊतांवर शस्रक्रिया सुरु आहे.

संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अँजिओग्राफी झाल्यानंतर समोर आले की, त्यांच्या रक्तवाहिन्यात दोन ब्लॉक आहेत. यानंतर आता त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like