‘कोरोना’ काळात नोकरी गेल्यानं खचून न जाता, टोकाचे पाऊल न उचलता लढावं यासाठी लढणारे 2 ‘करिअर योद्धे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वच ठिकाणी सर्वात मोठं संकट आहे ते म्हणजे पोटा पाण्याचं. कोरोना मुळे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्यात व ज्यांच्या आहेत त्यांच्या टिकवणे अवघड झाले आहे. यातच बघितलं तर महाराष्ट्रात खूप जणांचे जॉब्स गेलेत. मग अश्या मुलांनी खचून न जाता व टोकाचे पाऊल न उचलता लढलं पाहिजेत यासाठी. मनिष ठोकरे आणि मनोज कदम हे लढत आहेत.

मनिष ठोकरे आणि मनोज कदम हे दोघे सुद्धा ग्रामीण भागातून आले आहेत त्यांनी जे प्रॉब्लेम बघितले किंवा सोसले ते आपल्या येणाऱ्या मुलांना नाही आले पाहिजेत याच उद्देशाने काम चालू केले आणि आज पर्यंत त्यांच्या सोबत जवळपास 25+ हजार मुलं/मुली जोडले गेलेत ते पण अगदी professionally. प्रत्येक week मध्ये त्यांना मार्गदर्शन करुन त्यांना train करून tie up असलेल्या कंपनी मध्ये पाठवलं जाते..

याच माध्यमातून मनीष आणि मनोज आज या कठिण कोरोना काळात सुद्धा मुलांना कशीलच फीस न घेता पूर्णपणे मोफत मदत करत आहेत स्वताची नोकरी, घर सर्व बघून या कठीण काळात मुलांना interview कसा द्यावं, resume कसा असावा, jobs कुठे बघावे, रेफरन्स कसे मिळवावे अगदी सध्या आणि सोप्या व मराठी मधुन मुलांपर्यत पोहचवत आहेत..

जिद्द आणि इच्छा शक्ती असेल तर आपण कुठलं ही काम तसेच समाजसेवा करु शकतो 2016 पासुन दोघांनी सुरू केलेलं Network आज 25+ हजार मुलाचं झालं आहे तसेच त्यांनी आता पर्यंत नोकरी मेळावा, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम हातात घेऊन वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात तसेच कॉलेजमधील मुलांना ट्रेन करत आहेत.

शिक्षण आणि नोकरी यातील दुवा म्हूणन हे दोघे आज काम करत आहेत त्यांचा “एकच ध्यास आहे मुलांना पोटा पाण्यास लावणे”

कोरोना काळात खूप योद्धे बघितले पण करिअर योद्धा म्हूणन या दोघांनी मार्च पासून आता पर्यंत (माहिती असलेला आकडा) 319+ जणांना नोकरी मिळवून दिली आहे. आज ते Whatspp व Facebook च्या माध्यमातून मुलांपर्यत नोकरीची माहिती पुरवत आहेत..

Facebook Social media वरती Jobs For All नावाने page आहे तिथे सर्वांनी जॉईन व्हावं. Social media चा योग्य वापर करून तुम्ही सुद्धा नोकरी मिळवू शकता. चला तर सर्वजण मिळण एक मेकांना नोकरी साठी मदत करूयात.