सांगलीत गांजा विकणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील हनुमाननगर आणि मिरजेतील रेल्वे स्थानकावर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३१ हजार रूपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला.

गणेश खन्ना नायडु (वय २८, रेल्वे स्टेशन, मिरज), कपील रमेश कांबळे (वय २५, हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गांजासह अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले. पथक गस्त घालत असताना मिरजेतील रेल्वे स्थानक जवळ एका पानपट्टीत गांजा विक्री केली जात असल्याची माहिती पिंगळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. तेथे १९ गांजाच्या पुड्या व २ किलो गांजा असा १८ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पानपट्टी चालक गणेश नायडू याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सांगलीतील हनुमाननगर येथील एका शाळेजवळ कपील कांबळे हा गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयित कपील कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ किलो ६६६ ग्रॅम गांजा असा १३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, युवराज पाटील, वैभव पाटील, सागर लवटे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच