दोन सराईत गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – खंडणी दरोडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी भोसरी येथे जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. लोकेश वसंत कुळे (२५, रा. शीतल बाग, भोसरी) आणि अनिकेत सुभाष कोथींबीरे (२४, रा. संत तुकाराम नगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील फरार आरोपी लोकेश कुळे राजमाता कॉलेज समोरील दुर्गा नाष्टा हाऊसजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश कोकणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, निशांत काळे, आशिष बनकर, शरीफ मुलाणी, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.

आरोपी लोकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला खंडणी दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखा येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मंगळवारी पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अनिकेत कोथींबीरे प्रियदर्शनी शाळेजवळ दिघी रोड भोसरी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून अनिकेत याला ताब्यत घेतले. त्यालाही खंडणी दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखा येथून आणून कसून चौकशी केली असता त्यानेही फूस लावून पळवून नेऊन जबरी चोरी केल्याची कबुली दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us