उत्पान्नापेक्षा जास्त 2 कोटींची जास्त संपत्ती, अ‍ॅन्टी करप्शनकडून पुण्यात नगररचना सह संचालकांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता अधिक संपत्ती आढळून आल्याने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नगररचना विभागातील सह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सह संचालक अमरावती जिल्ह्यात कार्यरत आहेत.

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील आलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत नाझीरकर हे सध्या अमरावती जिल्हा येथे नगररचना विभागात सह संचालक आहेत. यापूर्वी ते पुण्यात नेमणुकीस होते. त्यादरम्यान त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याबाबत एसीबीकडे तक्रार होती. त्याची ऐसीबीकडून चौकशी सुरू होती. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यात जवळपास दोन ते अडीच कोट रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर एसीबीने आज त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.