पुण्यातील 2 कोटीचं खंडणी प्रकरण ! पत्रकार देवेंद्र जैन, शैलेश जगतापसह महिला आरोपीस जामीन मंजूर, समर्थ पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत रास्ता पेठेतील जागा व 2 कोटींची खंडणीप्रकरणात अटकेत असणारे पत्रकार देवेंद्र जैन बडतर्फ पोलीस आणि महिलेचा न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी पत्रकार आणि बडतर्फ पोलिसाला समर्थ पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.

पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप आणि एका महिला अशी जामीन झालेल्या तिघांची नावे आहेत. तर याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे, अमोल सतीश चव्हाण यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर कर्नाटकी (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे.

कर्नाटकी यांना धमकावत त्यांच्याकडून बावधन येथील फ्लॅटचा करारनामा आणि दीड लाख रुपये घेतले. तर दोन कोटींची खंडणी आणि रास्ता पेठेतील जागा देण्यासाठी धमकवल्याप्रारकणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तर पत्रकार जैन आणि बडतर्फ पोलीस जगताप यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावतीने वकील विजयसिंह ठोंबरे यांनी जामिनासाठी बाजू मांडली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना देश न सोडण्याच्या तसेच तपासात सहकार्य करण्याच्या आणि 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. दरम्यान कोथरुड पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर समर्थ पोलिसांनी फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यात पत्रकार देवेंद्र जैन आणि बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांना ताब्यात घेतले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like