पुणे विद्यापीठात नोकरीच्या अमिषाने तरुणांना ५ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे विद्यापीठात लिपीक पदाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोघांकडून एकूण ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात खडक आणि येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यशवंत शिवाजी खेडकर (रा. वंजारवाडी बारामती) याच्यावर गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तर याप्रकरणी सुनील अनिल आद्रट (वय ३०, रा. पिंपळे निलख) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर कोंडीबा दगडू घाग (वय ८८, रा. शिवाजीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यशवंत खेडकर याच्याशी फिर्यादी सुनील आद्रट यांच्याशी ओळख झाली. त्याने आद्रट यांना पुणे विद्यापीठात लिपीक पदाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने नोकरी लावली नाही. किंवा पैसेही परत केले नाहीत. हा प्रकार मार्च २०१३ ते आजपर्यंत घडला.

तर कोंडीबा घाग यांची यशवंत खेडकर याच्याशी २०१५ मध्ये ओळख झाली. त्याने घाग यांचा नातू अमरजित संजीव भागवत याला पुणे विद्यापीठात लिपीक पदाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे ६ लाख रुपयांची मागणी केली. घाग यांनी त्याला ३ लाख रुपये दिले. त्यानंतर मात्र त्याने नोकरी न लावता पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.