LCB ची कारवाई ; अफूची शेती करणारे 2 शेतकरी ताब्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यातील बळसाणे गावात अफूची शेती करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने लाखों रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बळसाणे गावात अफुची शेती करण्यात येत होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार गुरुवारी सकाळी दहा वाजता पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून छापा टाकण्यात आला. यावेळी आयशर टेम्पोत अफुचे पिक भरल्याचे दिसले. अफू विक्रीसाठी नेणार तेंव्हाच स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केली.

ह्याही बातम्या वाचा –

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत

अखेर स्थायी सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड

पुणे वाहतुक पोलिसांची ‘वसूली’ मोहिम जोरात