पुण्यात बेकायदेशीर राहणाऱ्या 2 परदेशी नागरिकांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पुण्यात राहणाऱ्या दोघांना विशेष शाखेच्या परकिय नागरिक नोंदणी शाखेने अटक केली आहे. यामध्ये एका केनीयन महिलेला आणि एका नायझेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२६) कोंढवा येथील वडाची वाडी येथे करण्यात आली. स्टेनली ओबीरा इबेमेरी असे नायझेरियन नागरिकाचे नाव आहे.तर ईथर काली मबीथी मवंगंगी असे अटक करण्यात आलेल्या केनीयन महिलेचे नाव आहे.

परकिय नागरिक नोंदणी शाखेचे पोलीस कर्मचारी केदार जाधव यांना कोंढवा येथील वडाची वाडी येथे एक परदेशी नागरीक राहात असल्याची माहिती मिळाली. या व्यक्तीला डिसेंबर 2012 मध्ये हद्दपार करून त्याला काळ्यासुचीत टाकण्यात आले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसानी वडाची वाडी येथे सापळा रचून स्टेनली याला अटक केली. त्यावेळी त्याच्या घरामध्ये एक केनियन महिला बेकायदेशिररित्या रहात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, पोलीस कर्मचारी केदार जाधव, पॉल अ‍ॅन्थोनी, दिलीप काची, आनंद शिंदे, गोवींद भगत, निलीमा खिलारे, संदिप कांबळे, सौरभ महाशब्दे, उमेश शिंदे, सचिन सहाणे, रेहना शेख, करुणा सरकाटे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –