अहमदाबादहून अपहरण केलेल्या 2 मुलींची धुळे पोलिसांकडून सुटका, महिला ताब्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आज दुपारी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बस स्थानकात एक घटना घडली यामुळे काही वेळ बसस्थानकात भितीचे वातावरण झाले होते. शहर पोलीसांनी बस स्थानकातून दोन तरुणीसह एका महिलेला ताब्यात घेतले.

सविस्तर माहिती की अहमदाबादहुन दोन तरुणींना पळवुन नेल्याची घटना समोरील आली. अहमदाबाद पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण केले आहे. नातेवाईकांनी पोलीसांची मदत घेऊन मुलींच्या तपास करण्यास सुरवात केली. अहमदाबाद पोलीसांनी सुरत, महाराष्ट्र पोलीसांना मुलींचे व महिलांचे वर्णन बाबत माहिती कळविली व तसे व्हीडीओ फोटो हि पाठविले. ह्या महिला व तरुणी दिसल्या तर पोलीसांना कळवा. पोलीसांनी तपास केला असता. सिसीटिव्ही फुटेज मध्ये अहमदाबाद रेल्वे स्थानकाजवळ रिक्षेत तीन महिला व मुली बसताना दिसत असल्याचे निदर्शनास आले. त्या आधारे पोलीसांनी तपास चक्रे फिरवून दोन महिलांना अहमदाबादला पकडले त्यांचे कडुन माहिती मिळाली की एक महिला दोन तरुणींना सुरत मार्गाने धुळ्याहुन पुण्यात वाम मार्गासाठी नेत आहे. त्या दिशेने तपास व पाठलाग पोलीसांचा सुरु होता. हि गोपनिय माहिती शहर पोलीसांना मिळाली.

त्यांनी दोन पथके तयार करुन तपासकामी बस स्थानक व रेल्वे स्थानकावर पाठविली. याच दरम्यान एक महिला व दोन तरुणी तोडाला स्क्रार्प बांधुन संशयितपणे शहर पोलीसांना दिसल्या पोलीसांनी त्यांची विचारपुस केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. महिलां पोलीसांनी त्यांची कसुन चौकशी केली. असता महिलेने कबुल केले की या दोन्ही मुलींना मी अहमदाबादहुन पुण्याला नेत होते.

या दोन्ही विद्यार्थींनी बारावीत शिकत आहे. एका मुलीकडे हजारो रुपयांची रोकड हि मिळाली आहे. वडिल परदेशात मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. चांगल्या घरातील मुलींना फुस लावून पळवुन नेऊ परगावी देऊन वाम मार्गाला लावायचे हाच ताब्यात घेतल्या महिलेने कबुली जवाब दिला आहे.

1) गीता भानुदास निकम वय. 23. रा. टाकळी मीया खंडोबा वाडी वॉर्ड नंबर 4 ता. राहुरी. जि. अहमदनगर, ह्या महिलेच्या ताब्यातील 2) हनी रमेशभाई पटेल वय. 15 रा. 102 वंन्दे मातरम, आयकॉन वंदे मातरम क्रॉस रोड गोता, अहमदाबाद. 3) हेतल मुकेशभाई गोहील वय. 15. A 12 , सोमगोेकुल सोसायटी, अकबर सर्कल निळे नगर अहमदाबाद अशा तिघे हि संशयिरित्या बस स्थानकात फिरताना अढळुन आल्या प्रकरणी शहर पोलीसांनी यांना ताब्यात घेतले आहे. अहमदाबाद वाडज पोलीस ठाण्यांशी संपर्क केला असता तिथे मुलीचे मामा यांनी अपहरणांचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या तिनही मुलींना बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे. अहमदाबाद पोलीस आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली.

सदर कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी राजु भुजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली. पो नि राजकुमार उपासे, सपोनि तिगोटे, पो. ना. योगेश चव्हाण , पोकॉ तुषार मोरे, राहुल गिरी, रणजित वळवी, माया ढोले, वंदना वाघ, सुशिला वळवी. आदींनी केली आहे.

Visit : Policenama.com