Corona भितीदायक ! भारताच्या फक्त 2 राज्यातून येत आहेत संपूर्ण युरोपपेक्षा जास्त केस

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस वेगाने वाढत चालला आहे. आता तर देशात रोज सुमारे 48-49 हजार केस समोर येऊ लागल्या आहेत. देशात कोरोनाचा प्रसार एकसारखा नाही. महाराष्ट्र, तमिळनाडु, दिल्ली सारख्या राज्यात एक लाखपेक्षा जास्त केस आहेत. झारखंड, छत्तीसगढ सारख्या राज्यांमध्ये 10 हजारपेक्षा कमी केस आहेत. भारताच्या काही राज्य ही सर्वात जास्त केस आणि मृत्यूच्या प्रकरणात जगातील अनेक देशांच्या पुढे आहेत. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आकडा एकत्र केला तर या दोन राज्यांमध्येच आता संपूर्ण युरोपपेक्षा जास्त केस येऊ लागल्या आहेत.

भारतात शुक्रवारी 48 हजारपेक्षा जास्त कोरोना केस आल्या. हा लागोपाठ दुसरा दिवस होता, जेव्हा देशात इतक्या जास्त केस समोर आल्या आहेत. यासोबतच देशात कोविड-19 च्या एकुण 13.37 लाख केस झाल्या आहेत. यापैकी 4.55 लाख केस अ‍ॅक्टिव्ह आहेत. सुमारे 8.50 लाख लोक कोरानातून बरे झाले आहेत, तर 31,400 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 इंडियानुसार भारतात यावेळी सर्वात जास्त केस महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून येत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 9615 केस आल्या. याच दिवशी आंध्र प्रदेशात 8147 केस आढळल्या. म्हणजे दोन्ही राज्यांत शुक्रवारी एकुण 17,762 केस आल्या.

महाराष्ट्र-आंध्रमध्ये रोज 17 हजार केस
महाराष्ट्रात बुधवार, गुरुवार, शुक्रवारी अनुक्रमे 10576, 9895 आणि 9615 केस आल्या आहेत. आंध्र प्रदेशात या तीन दिवसात अनुक्रमे 6045, 7998 आणि 8147 केस आल्या आहेत. जर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे आकडे एकत्र केले तर या दोन राज्यात बुधवारी एकुण 16,621 केस आढळल्या. अशाच प्रकारे गुरुवारी 17,893 आणि शुक्रवारी 17,762 केस आल्या. म्हणजे, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात सरासरी रोज एकुण 16-17 हजार केस येत आहेत.

युरोपमध्ये सुद्धा रोज 16-17 हजार केस
एखादा देश किंवा राज्याची तुलना एखाद्या खंडाश करणे स्वाभाविक वाटत नाही, परंतु जर दोन्हीमध्ये समानता असेल तर हे एक आश्चर्य सुद्धा होते. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात रोज येत असलेल्या केसची तुलना युरोपशी केल्यास असेच काहीतरी होत आहे. युरोपमध्ये बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी अनुक्रमे 15640, 17233 आणि 16175 केस आल्या. तीन दिवसात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात ज्या केस आल्या, त्या युरोपपेक्षा जास्त आहेत. मात्र, शुक्रवारचा युरोपचा आकडा आता अपडेट होऊ शकतो. तरीसुद्धा हे पक्के आहे की अपडेट केलेला आकडा महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या खुप जवळ असणार.

युरोपात रोज 300-400 मृत्यू
युरोपमध्ये बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोरोनामुळे अनुक्रमे 384, 357 आणि 405 मृत्यू झाले आहेत. एप्रिल-मे मध्ये याच युरोपमध्ये रोज एक हजारपर्यंत मृत्यू होत होते. आता या खंडात रोज होणार्‍या मृत्यूंमध्ये घट झाली आहे. भारतात रोज 700पेक्षा जास्त मृत्यू होऊ लागले आहेत. यापैकी निम्मे मृत्यू तर केवळ तीन राज्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडुत होत आहेत. म्हणजे, मृत्यूच्या प्रकरणात भारताची तीन राज्य मिळून युरोपची बरोबरी करत आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडुत शुक्रवारी 415 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

युरोपमध्ये आतापर्यंत 2 लाख मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे एप्रिल-मेमध्ये यूरोप या महामारीमुळे वाईटप्रकारे पीडित होता. यामुळेच या खंडात आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. युरोपपेक्षा जास्त मृत्यू तर उत्तर अमेरिका खंडात (2.04 लाख) झाले आहेत. आशियामध्ये आतापर्यंत 87 हजार आणि दक्षिण अमेरिका खंडात 1.30 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 3.50 लाख, तमिळनाडुत 2 लाख केस
भारतीय राज्यांपैकी सर्वात जास्त 3.50 लाख केस महाराष्ट्रात आहेत. तमिळनाडुत सुद्धा 1 लाख 99 हजार 785 केस आहेत. दिल्लीत 1.28 लाख केस आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये 80 हजारपेक्षा जास्त केस आहेत. देशात सर्वात जास्त 13 हजार मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.