“भारत फक्त आपलाच नाही, त्यांचाही”

लखनऊ : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर येथील पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून काश्मिरी तरुणांवर मारहाणीचे प्रकार समोर आले. अशीच उत्तर प्रदेशातील रस्त्यावर ड्राय फ्रुट विकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही तरुण काश्मिरचे आहेत. हा मारहाणीची व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. त्यामुळे या व्हीडिओवर सर्वत्र नाराजीही व्यक्त होत आहे. भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर हा व्हीडिओ पाहून चांगलाच भडकला आहे.

गौतम गंभीरने यासर्व प्रकरणी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना फार अपमानास्पद आहे. काश्मीर मधील व्यापारांना दिवसाढवळ्या आपल्या देशातच मारहाण होते, ही घटना फार अपमानजनक आहे. भारतावर जेवढा आपला हक्क आहे तेवढाच त्यांचा देखील आहे. आपण कोणत्या राष्ट्रवादाची मूळ पेरत आहत? असा प्रश्न गौतमने उपस्थित केला आहे.

व्हिडिओमध्ये काही लोक या ड्रायफुट विकणाऱ्या तरुणांना मारहाण करत असल्याचे दिसतं आहे. या व्हिडिओत एक जण ‘त्यांना का मारत आहेत’ अशी विचारणा करत आहे. त्यावर त्याला सांगण्यात आलं की, ‘हे काश्मिरी तरुण आहेत. हे आपल्या सैन्यावर तिथे दगडफेक करतात.’ या दरम्यान काही जणांनी त्या दोन्ही काश्मिरी तरुणांकडे त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. या काही विकृत लोकांनी तरुणांची अमानुषपणे मारहाण केली. पण सुदैवाने तेथील पादचाऱ्यांनी मध्यस्थी करुन त्यांना वाचवले.

दरम्यान, या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. बजरंग सोनकर असे या आरोपीचे नाव आहे. काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रातील यवतमाळ मध्येही काही दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती.

ह्या हि बातम्या वाचा

मॅक्सवेलचा त्रिफळा उडवण्यात धोनीचाही हात ; पहा व्हीडिओ

पुण्याच्या मध्यवर्ती व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत

वाह रे पालकमंत्री ; ‘त्या’ अहवाल प्रकाशनानंतर गिरीश बापट सोशल मीडियावर ट्रोल