अधिकाऱ्याने घराच्या तळघरात लपवून ठेवले होते 2 लाख कोटी रोख आणि 13 टन सोने, सरकारही हैराण

पोलीसनामा ऑनलाइन – जर एखाद्या अधिकाऱ्याच्या घरातून 2 लाख 62 हजार कोटी रुपये रोख आणि 13 टन सोनं बाहेर पडलं तर त्या देशाच्या सरकारलाही धक्का बसेल. आपल्या शेजारच्या चीनमध्येही असेच काहीसे घडले. जेव्हा एका माजी सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर चीनमध्ये छापा टाकला गेला, तेव्हा त्यांच्या तळघरात असेे काही समोर आले आहे, जे पाहून चिनी सरकारदेखील हैराण झाले.

येथे ज्या अधिकाऱ्याच्या घरातून इतकी संपत्ती बाहेर आली त्याचे नाव झांग आहे. ते हायकू शहराचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्याच्या घरावर छापा टाकताना 13 टन सोनं आणि दोन लाख 62 हजार कोटींची रोकड सापडली. त्या काळात सोन्याची किंमत 26 अब्जपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्याच्या घरातून एवढी मोठी संपत्ती मिळाल्यानंतर तो चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मापेक्षा श्रीमंत असल्याचे बोलले जात होते. घराच्या बाहेर इतकी संपत्ती सापडल्यानंतर या माजी अधिकाऱ्यावर आर्थिक गुन्ह्यांसाठी खटला चालविला गेला. अधिकाऱ्याच्या घरात बेकायदेशीर पैसे ठेवले असल्याची माहिती कोठूनही शोध पथकाला मिळाली. जेव्हा शोध पथक त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांना काही विशेष आढळले नाही, परंतु जेव्हा टीम तळघरात गेली तेव्हा त्यांचेही डोळे दिपले.

तळघरचे दृश्य पाहून शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. इतके पैसे मिळाल्यानंतर राष्ट्रीय पर्यवेक्षी आयोगाला अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यासाठी यावे लागले. त्या अधिकाऱ्याच्या तळघरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की त्याचा तळघर सोन्याच्या विटाच्या मोठ्या ढिगाने म्हणजे सोन्याच्या पट्ट्यांनी भरलेला आहे.

दरम्यान, चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती, तेव्हापासून आतापर्यंत चीनमध्ये 10,000 हून अधिक भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या आहेत. या 10 हजार भ्रष्ट लोकांमध्ये 120 हून अधिक असे लोक आहेत जे महत्त्वाच्या पदांवर बसले होते. त्यातील काही सैनिकी अधिकारीही होते.