सोशल मिडियाच्या माध्यमातून रुग्णाला ५ दिवसात २ लाखांची ‘मदत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मिडियावर नेहमीच टिका टिपण्णी केली जाते. या माध्यमाच्या आजवर अनेक नकारात्मक बाबीच समोर आल्या. पण, जर याच माध्यमाचा चांगला उपयोग करायचे ठरविले तर त्यातून चांगली कामे होऊ शकतात, असा विश्वास देणारी एक घटना पुढे आली आहे. दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या तरुणाला सोशल मिडियाच्या माध्यमातून अवघ्या ५ दिवसात २ लाख रुपयांची मदत केली.

प्रदीप अशोक झरे (वय ३४) या तरुणाच्या दोन्ही किडनी निकामी झालेल्या होत्या. गेली दीड वर्ष त्याला आठवड्यातून ३ वेळा डायलिसिस आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी त्याच्या कुटुंबाने आयुष्यभराची कमाई खर्च केली. एक लहानसा मुलगा, बायको, आई-वडील यांची जबाबदारी त्याच्यावर होती. प्रदीपचे वडील किडनीदानास तयार होते. पुण्यातील स्टर्लिंग आणि बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये महिनाभर किडनी प्रत्यारोपणासाठी उपचार घेत आहे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, सचिन गांढुळ, गणेश गायकवाड, राजेंद्र मुळे, विनोद भोर आणि गजानन शिदे यांनी ‘ऑनलाईन क्राऊड फंडिंग’च्या माध्यमातून अवघ्या ५ दिवसांत जवळजवळ २ लाख रुपये जमविले व ते प्रदीपकडे उपचारासाठी सुपूर्त
केले.

प्रदीपच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्याच्या मित्रांबरोबर १०० दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली. प्रदीप ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीतून त्याला कामावरून काढून टाकले आहे. ही शस्त्रक्रिया जरी यशस्वी झाली असली तरी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या कुटुंबाला भयानक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यापुढेही आम्ही आमच्या मित्र परिवाराच्या वतीने प्रदीपच्या कुटुंबाला शक्य होईल तेवढा आर्थिक हातभार लावणार आहोत, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या