जत तालुक्यातील ३ हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील करेवाडी येथे बेकायदा सुरु असलेल्या देशी दारुच्या ३ हातभट्टीचे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रविवारी (दि.७) केलेल्या कारवाईत ७ हजार ९०० लिटर दारु बनवण्याचे रसायन, १७ लिटर दारु असा एकूण १ लाख ९२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावसाहेब बाळासाहेब गोपणे (रा. करेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. करेवाडी येथे बेकायदा हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पथकाने रविवारी करेवाडीत छापा टाकून तीनही हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यावेळी अन्य दोन संशयित पसार झाले. रावसाहेब गोपणे याला मात्र पथकाने ताब्यात घेतले. तीनही हातभट्टीवरील मिळून ७५ लिटर हातभट्टीची दारू, ७ हजार ९०० लिटर रसायन, प्लास्टीकचे कॅन, होसपाईप, पातेली असा सुमारे १ लाख 9९२ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6882934-cae1-11e8-9b9e-3fc6fb53b239′]

अधीक्षक शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान दि. २ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या गांधी सप्ताहात ही कारवाई केली आहे. ड्राय डे दिवशी विक्री करणार्‍यांसह बनावट दारूची विक्री व तस्करी करणार्‍यांवर कडक कारवाई सुरूच रहाणार असल्याचे अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी सांगितले.

जमिनीच्या वादातून रॉडने मारहाण
सातारा: जमिनीच्या जुन्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.जयवंत बाळकृष्ण बोडके,प्रमोद जयवंत बोडके ( दोघे रा. कोंडवे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय मानसिंग बोडके (रा.कोंडवे) याने तक्रार दिली आहे. फिर्यादी व संशयीत आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहे. त्याचाच राग मनात धरून संशयीतांनी शुक्रवारी तक्रारदाराला लोखंडी रॉडने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास सातारा तालुका पोलिस करत आहेत.

[amazon_link asins=’B01L3I1BF0,B01G5I8YLC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e048cd8c-cae1-11e8-917e-f56310b61a27′]

पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू
सातारा: पुलवरून पडलेल्या एकाचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.उत्तम पांडूरंग मोरे (वय 45.रा.कारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्योधन मोरे यांनी तक्रार दिली आहे.उत्तम मोरे हे कारी गावानजीक असलेल्या एका पुलावर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. त्यातच ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.