मंदीचा पहिला फटका ! मारूतीचे गुरूग्राम, मानेसर प्रोजेक्ट 2 दिवसांसाठी बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या मंदीचा सर्वात मोठा फटका सध्या वाहननिर्मिती क्षेत्राला बसताना दिसून येत आहे. वाहननिर्मिती मधील अनेक मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला असून होंडा, मारुती यांसारख्या कंपन्या आपले उत्पादन कमी करत आहेत तर काही कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे मारुती सुझुकी आपले गुरुग्राम आणि मनेसरमधील उत्पादन दोन दिवस थांबवण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन बंद होणारी हि पहिली कंपनी ठरली आहे.

या दोन प्रकल्पातील उत्पादन हे 7 आणि 9 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार असून  या दोन्ही दिवशी कंपनीने नो प्रोडक्शन डे म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे यादिवशी कंपनीत कोणतेही उत्पादन होणार नाही. 2012 नंतर अशा प्रकारे उत्पादन थांबवण्याची कि कंपनीवर पहिलीच वेळ आली आहे. त्यामुळे आता कामगारांवर देखील बेरोजगार होण्याची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहेत.

उत्पादन आणि विक्री दोन्ही कमी

वाहनांची संख्या वाढली तर मारुती आपले उत्पादन कमी करत असते किंवा उत्पादन थांबवत असते. मात्र यावर्षी कंपनीला थेट उत्पादन थांबवावे लागल्याने मंदीचा थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कंपनीने आपले उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.