home page top 1

माजी पंतप्रधान, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दोघांना अटक

बंगळुरू : वृत्तसंस्था – फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामूळे कर्नाटक पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. आता फेसबुक लाईव्ह व्हिडीओ डिलीट करून टाकला आहे. या दोन व्यक्तींना अटक केल्यामुळे भाजपने कर्नाटक सरकारवर टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तींनी २३ मेला लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असताना फेसबुक लाईव्ह केले होते. या फेसबुक लाइव्हमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी, एचडी देवेगौड़ा आणि कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांना शिव्या देण्यात आल्या होत्या. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्या दोन व्यक्तींना अटक केली. त्याचबरोरबर फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ देखील डिलीट करण्यात आला.

मुक्त पत्रकाराला सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात प्रतिक्रिया दिल्यामुळे पत्रकार प्रशांत कनोजिया यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी अटक केली होती. आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदा ठरवून प्रशांत कनोजिया यांना त्वरित सोडून देण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी राहुल गांधी यांनी योगींवर केली होती टीका

उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी प्रशांत यांना अटक केल्यामुळे योगी सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, जर प्रत्येक पत्रकार जो खोटी बातमी, चुकीचा रिपोर्ट देत असेल अशा पत्रकारांना अटक केल्यास जास्त करून वर्तमानपत्रात तसेच वृत्तवाहिन्यांवरील स्टाफमध्ये काम करण्यासाठी पत्रकारच उरणार नाहीत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मूर्खपणाचे काम करत आहेत. अटक केलेल्या पत्रकाराला लवकरात लवकर सोडले पाहिजे.

आता, कर्नाटक सरकारने अशाच प्रकरणासाठी दोन व्यक्तींना अटक केल्यामुळे कर्नाटक भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

Loading...
You might also like