Post_Banner_Top

शस्त्रांसह २ सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कारमधून जाणाऱ्या दोन सराईत गुंडांकडून विश्रामबाग पोलिसांनी  वैकुंठ स्मशानभुमीजवळ शस्त्रे जप्त केली. याप्रकऱणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

निखिल गणेश पवार (वय २४,रा. नामदेव सोसायटी, सहकारनगर) अक्षय मारुती दसवडकर (वय २२,रा. अरण्येश्वर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेत वैकुंठ स्मशानभूमीजवळ थांबलेल्या कारमध्ये  शस्त्रसाठा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये दोन तलवारी, कुऱ्हाड अशी शस्त्रे  सापडली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांवरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संगम परगेवार, बाबा दांगडे, संजय बनसोडे, सचिन जगदाळे आदींनी ही कारवाई केली.

 

 

 

Loading...
You might also like