CBI च्या दिल्ली मुख्यालयातील 2 अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, केलं ‘क्वारंटाईन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या मुख्यालयात तैनात केंद्रीय अन्वेषण विभागाचे दोन अधिकारी गेल्या तीन दिवसांत कोविड – 19 चाचणीत सकारात्मक आढळले आहेत. पहिल्यांदा तपासणीत असे दिसून आले कि, त्यांपैकी एका अधिकाऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तर दुसऱ्या अधिकाऱ्याची चाचणी शुक्रवारी सकारात्मक आली होती. एजन्सीच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या, दोन्ही अधिका-यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांना  माहिती देण्याव्यतिरिक्त त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय गरजा पुरविल्या जात आहेत.

या संदर्भात सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,  सीजीओ परिसरात  असलेल्या सीबीआय मुख्यालयात कठोर प्रक्रिया पाळल्या जात आहेत. कामाच्या ठिकाणी वारंवार स्वच्छता केली जात आहे आणि आरोग्य अधिकार्यांनी ठरविलेल्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे. मुख्यालयात सामाजिक अंतरांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे आणि सामान्य क्षेत्रांव्यतिरिक्त मुख्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर प्रवेशावेळी  आणि बाहेर जाण्यासाठी हँड सॅनिटायझर्स वापरण्यात येत आहेत. एन्ट्री आणि एग्झिट दोन्ही केंद्रांवर हात धुण्यासाठी आणि थर्मल स्कॅनिंगसाठी सुविधा स्थापित केल्या आहेत. एजन्सीच्या कामावर परिणाम झाला नाही आणि मुख्यालयातील काम अखंडपणे सुरू आहे, असे  अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान,  लॉकडाऊनच्या काळात कायद्याची अंमलबजावणी, गुप्तचर आणि तपास यंत्रणांमध्ये काम करणारे अधिकारी त्यांच्या कामाच्या स्वरुपामुळे कोरोना महामारीने प्रभावित झाले आहेत. सरकारने सुनिश्चित केले की, उक्त कोरोना योद्ध्यांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि जेव्हा या साथीच्या रोगाचा परिणाम होतो, तेव्हा त्यांना योग्य ती काळजी आणि औषधे दिली जातात. साथीच्या रोगाविरूद्धच्या लढाईत सहभाग घेतल्याबद्दल सरकारने त्यांचे कौतुकही केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like