यड्राव फाटया जवळून 2 पिस्तुले, 12 काडतुसे जप्‍त

कोल्हापुर : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हयात नाकेबंदीच्या दरम्यान शहापूर पोलिसांनी यड्राव फाटा येथील हॉटेल पवनच्या जवळुन दोघांकडून 2 देशी बनावटीचे पिस्तुले, 12 काडतुसे आणि मोटारसायकल जप्‍त केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असुन अटक आरोपींविरूध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ddb301c5-cc56-11e8-a81a-f550803ee9c3′]

विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील (23, रा. डफळापूर ता.जत, जि. सांगली) आणि सतिश शिवाजी कोळी (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी कोल्हापुर जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले होते. डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजी विभागाचे उपविभागीय अधिकारी धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय हारूगडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कवडे, राजेंद्र यादव, रियाज मुजावर, सहाय्यक उपनिरीक्षक तानाजी गुरव, रजपुत, कोरवी, घोंगडे, पोलिस हवालदार बोजगर, इम्तीहाज कोठीवाले, गवळी, पोलिस कर्मचारी अमर पाटील, अमर कदम, गुरू चव्हाण, मनोज मडीवाल आणि मादनाईक हे मंगळवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास यड्राव फाटा येथील हॉटेल पवनच्या जवळील रस्त्यावर नाकाबंदी करीत होते.

[amazon_link asins=’B01N9QZ0TR,B017WDVV3M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5bf2a43-cc56-11e8-a774-557a6a0402f1′]

त्यावेळी आरोपी हे संशयितरित्या मोटारसायकलवरून जात होते. पोलिसांनी पाहुन ते पळुन जात होते. ही बाब पोलिस पथकाच्या लक्षात आली. पोलिस पथकाने आरोपींना थांबण्यास सांगितले. मात्र, ते पुढे-पुढे जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 12 जिवंत काडतुसे आढळुन आली. पोलिसांनी ती जप्‍त केली आहेत. आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी स्वतः जवळ अग्‍नीशस्त्रे कशामुळे बाळगली अगर ते अग्‍नीशस्त्रांची विक्री करणार होते काय याबाबींचा तपास शहापूर पोलिस करीत आहेत