प्रशासकीय कारणास्तव २ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ पोलीस दलातील २ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या दोन पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक एम. राज. कुमार यांनी आज (रविवार) बदलीचे आदेश काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे.

पोलीस निरीक्षक अनिल विष्णू किनगे (नेर पोलीस स्टेशन ते उमरखेड पोलीस स्टेशन), दिनेशचंद्र रघुवरदयाल शुक्ला (अवधुतवाडी पोलीस स्टेशन ते घाटंजी पोलीस स्टेशन) यांची आज बदली करण्यात आली आहे.

तर शनिवारी रामकृष्ण महादेवराव महल्ले (दिग्रस पोलीस स्टेशन ते पांढरकवडा पोलीस स्टेशन), असलम इसा खान (घाटंजी पोलीस स्टेशन ते प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक उप शाखा वणी) यांची बदली करण्यात आली आहे. असलम खान यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करण्यात आली आहे.