ट्रक चालकांना लुटणाऱ्या दोघांना पकडले

जालना : पोलीसनामा ऑनलाईन

औद्यागिक परीसरात माल घेऊन आलेल्या ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणा‍ऱ्या २ जणांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगेश प्रकाश मुळे आणि आकाश शिवाजी मोगरकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbdf2ffa-c923-11e8-8659-ef149b70e840′]

रंजन यादव (रा. परीयावा, उत्तर प्रदेश) यांनी ३ ऑक्टोबरला त्यांच्या ट्रकमधील भंगाराचे सामान ओम साईराम कंपनीमध्ये विकून त्यांचे आलेले १९ हजार रूपये घेवून येत होता. सायंकाळी ४ च्या सुमारास सनराईज हॉटेलजवळ आल्यावर पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरुन २ जण आले. त्या दोघांनी ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून अज्ञातस्थळी घेवून गेले आणि त्याच्याजवळी रक्कम लुटली. या प्रकरणी चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कुंभेफळ येथे जावून मंगेश प्रकाश मुळे याला ताब्यात घेवून विचारपूस केल्या नंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. त्याला साथीदाराबद्दल विचारताच त्याने आकाश शिवाजी मोगरकर (रा. चंदनझीरा) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यानेही ८ हजार रुपये काढून दिले. तसेच त्यांनी चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल, मोबाईल, चाकू आणि रोख रक्कम असा एकूण ७६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दिवाळीनिमित्त एसटीच्या ९ हजार ३०० जादा गाड्या

फेव्हर ब्लॉकने त्याचे डोके ठेचून तरुणाची हत्या

ठाणे :  फेव्हर ब्लॉकने त्याचे डोके ठेचून एका तरूणाचा निर्घुण हत्या करण्यात आली. ही घटना उल्हासनगरमधील गजबजलेल्या गोल मैदानात घडली आहे. उल्हासनगर पोलीसांनी मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. राजू लोंढे (४१) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.२ येथील गोल मैदान परिसरातील पाण्याच्या टाकीखालीच मृत राजू राहत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत राजू हा ३ अज्ञात व्यक्तीसोबत पाण्याच्या टाकीखाली बसला होता. यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या ३ जणांनी राजू यास मारहाण करून त्याच्या डोक्यात जवळच पडलेले फेव्हर ब्लॉक मारून त्याचे डोके ठेचले. यात तो जागीच ठार झाला. खून करून ते तिघेही फरार झाले.

[amazon_link asins=’B00I6FS3Q4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1135945-c923-11e8-9d9d-3b805f4aa86e’]