एका प्रेयसीसाठी दोन मजनूंचे गट समोरासमोर भिडले

मुंबई : वृत्तसंस्था

एका प्रेयसीसाठी दोन मजनू एकमेकांना भिडल्याची घटना दादर येथील गौतमनगर परिसरात घडली. त्यावेळी दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत दोघांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भोईवाडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’261dedbc-c967-11e8-98c1-4be6cb11d4ef’]

गौतमनगर परिसरात राहणाऱ्या जॉन आणि त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. जॉनचे पिंकी (नावात बदल) हिच्याशी प्रेमसंबंध होते. तसेच वरळीत राहणारा निशांत ब्रिजेश सिंग याचेदेखील तिच्याशी सूत जुळले होते. त्यामुळे पिंकीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. यापूर्वी त्यांच्यात बाचाबाची झाली होती. मात्र, गुरुवारी (दि.४) तारखेच्या रात्री निशांत १० ते १२ जणांना घेऊन गौतमनगरात धडकला. तेथे जॉन आणि निशांतमध्ये मारामारी झाली.

परिसरातील मुलाला मारत असल्याचे बघून गौतमनगरातील तरुण पुढे आले आणि त्यांनी निशांत, त्याचा मित्र रौफ आणि त्यांच्या अन्य साथीदारांना तुफान मारहाण केली. या मारहाणीत निशांत आणि रौफ गंभीर जखमी झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पिंकीसाठी मारामारी करणाऱ्या जॉनसह अन्य चौघांना भोईवाडा पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d092a97-c967-11e8-b3a9-6bd35c6f0283′]

रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाऱ्या सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील कोटमगावरोडवरील देसाई डीम सिटीमध्ये श्याम रमाकांत कल्याणकर (६५) कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते पत्नी व सासूसह द्वारका सर्कलकडून पाथर्डी गावाकडे रिक्षाने जात होते. भारतनगर चौफुलीजवळ त्यांची रिक्षा बंद पडली असता रिक्षातील ३५ व २२ वयोगटांतील दोघा संशयितांनी रिक्षाबंद पडल्याचे सांगत ‘तुम्ही दुसºया रिक्षाने पाथर्डी गावाकडे जा,’ असा सल्ला दिला़ तसेच या संधीचा फायदा घेत रिक्षातील बॅगेत असलेले पाकीट चोरले. कल्याणकर यांच्या चोरी गेलेल्या पाकिटात ४० हजार रुपये किमतीची ३७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती. ५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, दोन हजार रुपये किमतीच सात ग्रॅम वजनाचे कानातले झुमके व वेल तसेच दीड हजार रुपये किमतीचा चांदीचा ग्लास असा ४८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज होता.