काय सांगता ! होय, अधिकाऱ्यानं 2 बहिणींचा ‘पासपोर्ट’ नाहीच बनवला, ‘नेपाळी’ दिसत असल्याचं ‘अर्जा’वर लिहीलं !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशाच्या अनेक भागात विरोध सुरू आहे. या कायद्यावरून वाद सुरू असतानाच पंजाबच्या अंबालामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन बहिणींना पासपोर्ट बनविणार्‍या अधिकार्‍याने त्या नेपाळी सारख्या दिसतात म्हणून नकार दिला. या दोन्ही बहिणींनी पासपोर्टसाठी चंदीगडच्या पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला होता, पण अधिकार्‍यांनी त्यांच्या अर्जावर लिहिले, नेपाळीसारखी दिसते आणि नंतर पासपोर्ट बनविण्यास नकार दिला.

या दोन बहिणींना नेपाळींसारख्या दिसतात म्हणून पासपोर्ट नाकारल्याची घटना घडल्यानंतर हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी अधिकार्‍यांना प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. दोन बहिणी संतोष आणि हिना यांच्याकडे पोसपोर्टसाठी लागणारे आधार कार्ड, पॅनकार्ड, पदवी आदी सर्व कागदपत्रे होती. पण, पासपोर्ट कार्यालयाने त्यांची कागदपत्र न बघताच त्यांचे चेहरे पाहून नेपाळीसारख्या दिसता, असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले.

संतोष आणि हिना काही दिवसांपूर्वी चंदीगड येथील विभागीय पासपोर्ट कार्यालयात गेल्या होत्या, परंतु त्यांना पासपोर्ट देण्यात आला नाही. नंतर त्यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला, त्यांनी अधिकार्‍यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिकार्‍यांनी सांगितले की, प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांना लवकरच पासपोर्ट दिला जाईल. या दोन बहिणींपैकी संतोष हिने सांगितले की, पासपोर्ट कार्यालयाने नकार दिल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि मंत्री अनिल विज यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर आमच्या पासपोर्टवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/