दोन अट्टल घरफोड्यांना अटक ; ४ लाख १७ हजारांचे दागिने, मोपेड जप्त

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन – जयसिंगपूर शहरासह परिसरात घरफोडया करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जयसिंगपूर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 4 लाख 17 हजारांचे दागिने, एक मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक उर्फ सनदी (वय 26, मूळ गाव होसूर, जि. बेळगाव), राघवेंद्र उर्फ नागराज शंभूशेट्टी (वय 27, मूळ गाव मेलइडगुंजी, ता.होन्नावर, जि.कारवार, सध्या दोघे रा. वसंतदादा साखर कारखान्याजवळ माधवनगर रोड सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी जयसिंगपूर शहरात सात घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयसिंगपूरसह परिसरात गेल्या वर्षभरात या टोळीने धुमाकूळ घातला होता. जयसिंगपुरातील रेल्वे स्थानक ते उदगाव या बायपास रस्त्यावर मोपेड वाहनासह थांबलेल्या लक्ष्मण व राघवेंद्र या दोघाही संशयीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर सोन्याची बोरमाळ, चेन, मणी मंगळसूत्र असे दागिने मिळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली.

त्यांच्या घरातून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कर्नाटकात चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक विकास जाधव, जयसिंगपूरचे दत्तात्रय बोरीगिड्डे, उपनिरीक्षक रणजीत तिप्पे, अमोल माळी, किरण दिडवाघ, हवालदार वैभव दड्डीकर यांच्या पथकाने केली.

मोका अंतर्गत कारवाई करणार

घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या चोरट्यांच्या हाती 60 ते 70 हजारांची रोकड लागली होती. त्या रकमेतून त्यांनी चैनी केल्याचे उघड झाले आहे. त्यांचे आणखीन काही साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या चोरट्यांच्या टोळीवर लवकरच ‘मोक्कां’ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like