चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून ३ तोळे सोने. एकूण किंमत ७० हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला आहे. रिझवान नदीम मेमन वय २०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा आणि त्याचा साथीदार नदीम अल्ताफ मेमन वय २१, अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती, कोंढवा पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीबाबत तपास पथकातील पोलीस हवालदार राजस शेख व अजीम शेख यांना माहिती मिळाली. त्यानूसार वरीष्ठपोलीस निरीक्षक अनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार इक्बाल शेख, धीवर योगेश कुंभार, पांडुळे, निलेश वणवे, संजीव कळमबे, अमित साळुंके, सुरेंद्र कोळगे, जयवंत चव्हाण, किरण मोरे, उमाकात स्वामी, आदर्श चव्हाण, विलास तोगे, जगदीश पाटील, उमेश शेलार यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ७० हजार ९०० रुपये किंमतीचे ३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने अधिक तपासासाठी १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

Loading...
You might also like