Google ‘प्ले स्टोर’वर २ हजारांहून अधिक बनावट ‘App’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनीव्हर्सीटी सिडनी एन्ड सीएसआयआरओ डेटा ६१ ने गेल्या २ वर्षांत गुगल प्ले स्टोअरवर असणाऱ्या अ‍ॅप्सवर अभ्यास केला. या अभ्यासात १२ लाख अ‍ॅप्सची तपासणी केली आहे. या अभ्यासानुसार गुगल प्ले स्टोअरमध्ये २ हजारांपेक्षा अधिक बनावट अ‍ॅप्स असल्याचे समोर आले आहे. या बनावट अ‍ॅप्समुळे आपला मोबाईल फोन हँग होऊ शकतो.

प्ले स्टोअरमध्ये अनेक प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत ज्यांचे बनावट व्हर्जन आहेत. त्यात टेंपल रन, फ्री फ्लो आणि हिल क्लाइंब रेसिंगसारखे इतरही अ‍ॅप्सचे बनावट व्हर्जन आहेत. हे बनावट अ‍ॅप्स खऱ्या अ‍ॅप्स सारखे दिसतात. त्यामुळे अनेकदा ग्राहक खरे समजून खोटे अ‍ॅप्स डाऊनलोड करतात. डाऊनलोड केल्यानंतर ते कळून येतात पण डाऊनलोड न करता तांत्रिक तज्ज्ञाशिवाय कोणालाही हे अ‍ॅप्स ओळखता देखील येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची गल्लत होते.

बनावट अ‍ॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरी होण्याचा अथवा मोबाईल हॅक होण्याची शक्यता अधिक असते. अशा अ‍ॅप्सच्या वापरामुळे मोबाईल युजर्सना आर्थिक नुकसान तसेच डेटा चोरी होण्याचा धोका असतो, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.

जेव्हा आम्हाला कधी मोबाईल युजर्सकडून अशाप्रकारची तक्रार येते किंवा कोणताही अ‍ॅप्स गुगलने दिलेल्या पॉलिसीचं उल्लंघन करत असेल तर आम्ही तातडीने ते अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो, अशी माहिती गुगलने एका वृत्तपत्राला दिली आहे.

दरम्यान, या अभ्यासानुसार जवळपास २ हजार ४० अ‍ॅप्स असे आहेत की ते प्रसिद्ध असलेल्या १० हजार अ‍ॅप्ससारखेच दिसतात. यातील ४९ हजार ६०८ अ‍ॅप्सचं उद्दिष्ट युजर्सच्या मोबाईलवर परिणाम करणे हे असते. त्यामुळे ग्राहकांनी याबाबतीत सावध राहिले पाहिजे. कारण ग्राहक कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड केल्या नंतर टर्म्स आणि कनडिशन न वाचता ओके करत स्वीकारले जातात. याचा धोका आपल्या फोनला होऊ शकतो.

आरोग्यविषयक बातम्या 

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

You might also like