2 महिलांनी चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवलं 62 लाखांचं सोनं ; असा लागला सुगावा

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई अड्ड्यावर दोन महिलांनी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. देवनावी राधाकृष्णन आणि वासंती रामास्वामी अशा दोन्ही आरोपी महिलांची नावे आहेत. सकाळी 3.30 वाजता एअर अरबच्या उड्डाणात शारजाह ते कोयुम्बतूर पोहोचली होत्या. या महिलांनी चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये सोनं लपवलं होतं. कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर कस्टम विभागाने दोन महिलांकडून 62 लाख रुपये किंमतीचे 1.1 किलोग्रॅम सोनं जप्त केलं. यानंतर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त सूचनाच्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मेटल डिटेक्टरचा उपयोग केला. त्या महिलांनी ज्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर केला होता. त्यात पेस्ट रुपात सोन्याची तस्करी केली होती. या दोन्ही महिलांशिवाय त्या फ्लाइटमधून शहरात येणारे पाच जणं ४६ लाख रुपयांचं सोनं, दारू आणि सिगारेटसह पकडले गेले. त्यापैकी दोन चेन्नईपासून दोन पट्टीनमपासून आणि एक इल्यांगुडी येथे राहणारे होते.

यादरम्यान ईडीने २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या तस्करीशी संबंधित एका प्रकरणात केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी प्रमुख सचिव एम शिवशंकर यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याजवळील ३०. ८ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत १४. ८२ कोटी रुपये होती. बुधवारी कोच्चीच्या एका सत्र न्यायालयाकडून अटक वाढविण्यात आली आहे.