जिद्दीला सलाम ! ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असताना देखील नर्सनं दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशात कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख पार झाला आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना वॉरियर्स बनून लोकांची सेवा करणार्‍या नर्स आणि डॉक्टर यांनाही कोरोनाने शिकार केले आहे. मात्र पंजाबमध्ये 2 नर्सने आदर्श निर्माण केला आहे. पंजाबच्या पटियाला येथल राजींद्र रुग्णालयात या दोन्ही नर्स कोरोनावर उपचार घेत आहे. या दोघी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मात्र या सगळ्याचा परिणाम त्यांनी आपल्या अभ्यासावर होऊ दिला नाही.

नर्स पदासाठी सरकारी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसण्याची विनंती दोन्ही नर्सने सरकारकडे केली होती. त्यानुसार त्यांना आयसोलेशनमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोघांचाही पोस्ट करत, या मुलींचे कौतुक केले आहे. दुसरीकडे पंजाबमध्येही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. राज्यात 4 हजार 75 कोरोनाबाधित रुग्ण असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2700 निरोगी झाले आहेत. दरम्यान अमरिंदर सिंग यांनी 30 जूननंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.