पुण्यातील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना मध्यान्ह पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. विषबाधा झालेल्या मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ भारती हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मध्यान्ह पोषण आहारातून २० ते २५ मुलांना विषबाधा झाली.

मध्यान्ह पोषण आहारतून विषबाधा झालेल्या मुलांना अचानक उलट्या आणि इतर त्रास होऊ लागला. अचानक मुलांना त्रास होऊ लागल्याने शिक्षकांनी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विषबाधा झालेल्या मुलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. तसेच ते कोणत्या इयत्तेत शिकत होती हे देखील समजू शकले नाही. विषबाधा झालेल्या मुलांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त